अर्थ : निरनिराळ्या राशींचा परस्पर संबंध दाखवणारा नियम.
उदाहरणे :
सूत्रातील अज्ञात राशीचे मूल्य काढता येते.
समानार्थी : फॉर्म्युला
अर्थ : थोड्या शब्दात सांगितलेले जे पद वा वचन ज्यात अत्यंत गूढ अर्थ असतो.
उदाहरणे :
गुरूजींकडून मला जीवन जगण्याचे सूत्र मिळाले.
अर्थ : माहितीचा उद्गम.
उदाहरणे :
ह्या शहरात पाकिस्तानी हेर असल्याचे अधिकृत सूत्रांकडून कळते.
समानार्थी : स्रोत
अर्थ : एखाद्या योजनेसंदर्भातील संबंधित गोष्ट जी योजना फलद्रूप होण्यासाठी उपयोगी ठरते.
उदाहरणे :
ह्या योजनेतील दोन प्रमुख सूत्रांचा विचार करू.
समानार्थी : धागा
सूत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sootr samanarthi shabd in Marathi.