अर्थ : मोठ्या किमतीच्या चलनाच्या ऐवजी तेवढ्याच किमतीचे चलन घेणे.
उदाहरणे :
त्याने दहा रुपयाच्या दहा नोटा घेऊन शंभराची नोट मोडली
अर्थ : निश्चय, प्रतिज्ञा, नियम किंवा कायदा इत्यादींच्या विपरीत काम करणे.
उदाहरणे :
तुम्ही सरकारी नियमांचे उल्लंघन करीत आहात.
समानार्थी : उल्लंघन करणे
अर्थ : बल, प्रभाव, महत्त्व इत्यादी कमी करणे किंवा नष्ट करणे.
उदाहरणे :
दीर्घकाळच्या आजाराने त्याला दुर्बल केले.
समानार्थी : दुर्बल करणे
अर्थ : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
उदाहरणे :
तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
समानार्थी : सुटे करणे, सुट्टे करणे
अर्थ : व्रत, नियम इत्यादीत खंड पडणे.
उदाहरणे :
माझे महालक्ष्मीचे व्रत मोडले.
अर्थ : संबंध संपुष्टात येणे.
उदाहरणे :
ह्या प्रकरणामुळे त्यांची बर्याच वर्षांची मैत्री तुटली.
ह्या प्रकरणामुळे तिचे लग्न मोडले.
समानार्थी : तुटणे
अर्थ : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
उदाहरणे :
रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
समानार्थी : मोड करणे, सुटे करणे, सुट्टे करणे
अर्थ : असलेला क्रम विस्कळीत होणे.
उदाहरणे :
तो मधे घुसल्याने रांग मोडली
अर्थ : संपविणे किंवा राहू न देणे.
उदाहरणे :
त्याने रामाशी असलेले आपले संबंध तोडले.
समानार्थी : तोडणे
अर्थ : स्पर्धा इत्यादींमध्ये स्थापित केलेला सार्वकालिक विक्रम मागे टाकणे.
उदाहरणे :
भारोत्तोलकाने आपला जुना विक्रम मोडला.
समानार्थी : तोडणे
मोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. modne samanarthi shabd in Marathi.