अर्थ : गुप्त असलेली गोष्ट उघड होणे.
उदाहरणे :
तो पळून जाणार असल्याची बातमी आधीच फुटली
अर्थ : ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे.
उदाहरणे :
तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
समानार्थी : बाजूला होणे, बाहेर पडणे, वेगळे होणे, सोडणे
अर्थ : एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होणे.
उदाहरणे :
तीव्र मतभेदांमुळे तो गट फुटला.
अर्थ : भांडण होऊन वेगळे होणे.
उदाहरणे :
फटकळ सुनेमुळे ते घर फुटले.
अर्थ : खांडूक, गळू इत्यादींचे तोंड पडून वाहू लागणे.
उदाहरणे :
पायावरचा फोड फुटला.
अर्थ : फुटून निघणे वा बाहेर येणे.
उदाहरणे :
येथे नेहमी ज्वलामुखी फुटतो.
अर्थ : एखाद्या वस्तुचे वरील आवरण फाटणे वा त्याला चीर पडणे.
उदाहरणे :
अचानक ढोलकी फुटली.
अर्थ : कठीण किंवा ठोस वस्तू आघाताने तुटणे.
उदाहरणे :
मडके फुटले.
अर्थ : अतिशय वेदना होणे.
उदाहरणे :
डोकं ठणकायला लागलं की काहीच सुचत नाही.
समानार्थी : ठणकणे, मोडून येणे
अर्थ : फुटण्याची क्रिया.
उदाहरणे :
बाटलीच्या फुटण्याने सर्वत्र काचा पसरल्या.
अर्थ : एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होण्याची क्रिया.
उदाहरणे :
एक धूमकेतू पृथ्वीच्या वायूमंडळात फुटण्याची शंका वर्तवली आहे.
फुटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phutne samanarthi shabd in Marathi.