अर्थ : वस्तूंना दोरा इत्यादींनी गाठ देऊन आवळणे.
उदाहरणे :
घरी जाण्यापूर्वी त्याने लाकडे बांधली.
अर्थ : तंत्रमंत्र इत्यादीने एखादी शक्ती रोखणे किंवा थांबविणे.
उदाहरणे :
अनिष्ट गोष्टींची छाया पडू नये त्याने आपले घर बांधले आहे.
अर्थ : दोरी इत्यादीच्या दोन टोकांची गाठ मारून परस्परांना जोडणे.
उदाहरणे :
त्याने झाडावर झोका बांधला.
अर्थ : रश्शी इत्यादीने पाय इत्यादी जखडणे.
उदाहरणे :
आजारी म्हशीला सुई देण्याआधी तिचे पुढचे पाय दोरीने बांधले.
समानार्थी : जखडणे
अर्थ : निवासाची निर्मीती करणे.
उदाहरणे :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
समानार्थी : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बनविणे
अर्थ : कोणतीही वस्तू एकत्र करून बांधणे.
उदाहरणे :
बाहेरगावी जाण्यासाठी रामने आपले सामान बांधले.
अर्थ : एखादी विशिष्ट प्रकारची वास्तूरचना तयार करणे.
उदाहरणे :
लोक घर बांधत आहेत.
अर्थ : पुस्तकांची पाने एकमेकांना एका बाजूने चिकटतील अशा प्रकारे शिवणे.
उदाहरणे :
बांधणीकार पुस्तक बांधत आहे.
बांधणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baandhne samanarthi shabd in Marathi.