अर्थ : ईश्वर, परलोक इत्यादींचे अस्तित्व मानणारी व्यक्ती.
उदाहरणे :
नास्तिक्याचा अभिमान असला तरी आस्तिकांचा हेवा वाटतो.
समानार्थी : ईश्वरवादी
अर्थ : एक ऋषी जे जरत्कारूचे पुत्र होते व त्यांचे वर्णन महाभारतात मिळते.
उदाहरणे :
आस्तिकने जन्मेजयच्या सर्पयज्ञात तक्षक नावाच्या सर्पाला भस्म होण्यापासून वाचविले होते.
समानार्थी : आस्तिक ऋषी
अर्थ : ईश्वर, परलोक इत्यादींचे अस्तित्व मानणारा.
उदाहरणे :
आस्तिक मनुष्य विचाराअंती नास्तिक होऊ शकतो.
अर्थ : वेदांचे प्रामाण्य स्वीकारणारा.
उदाहरणे :
न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि वेदान्त ही सहा आस्तिक दर्शने आहेत.
आस्तिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aastik samanarthi shabd in Marathi.