अर्थ : ऋषींच्या वस्तीचे ठिकाण.
उदाहरणे :
श्रीराम विश्वामित्रांसह गौतम ऋषींच्या आश्रमात गेले
अर्थ : हिंदूंतील ब्राह्मणक्षत्रियादी त्रैवर्णिकांना धर्माने घालून दिलेले ब्रह्मचर्य,गार्हस्थ्य,वानप्रस्थ व संन्यास हे चार मार्ग वा अवस्था.
उदाहरणे :
वैदिकांचे आश्रम हे त्यांच्या समाजव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते
समानार्थी : वर्णाश्रम
अर्थ : गोसावी, ब्रह्मचारी, यती इत्यादिकांचे राहण्याचे स्थान.
उदाहरणे :
कन्याकुमारीत विवेकानंदांचा आश्रम आहे.
समानार्थी : मठ
आश्रम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashram samanarthi shabd in Marathi.