बेशिस्त (विशेषण)
शिस्त किंवा नियमाचे पालन न करणारा.
बाडबिस्तरा (नाम)
उपयोगाचे एकंदर सामान.
अफवा (नाम)
चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
तितर (नाम)
कावळ्यापेक्षा मोठा, गुबगुबीत, कासर तांबूस रंगाची, लांडी शेपटी असलेला, एक पक्षी."तित्तिर भांडखोर असल्याने ह्या पक्ष्यांच्या झुंजी लावतात".
ढेप (नाम)
तीळ,खोबरे इत्यादीकातील तेल काढून घेतल्यावर राहणारा चोथा.
हत्ती (नाम)
सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद.
मूर्ख (नाम)
जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती.
कवड्या तितर (नाम)
आकाराने गाव तित्तिराएवढा एक पक्षी.
बिनडोक (विशेषण)
ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
अप्रचलित (विशेषण)
चलनात नसलेला.