अर्थ : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
उदाहरणे :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
समानार्थी : चेतनशक्ती, चैतन्य, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राणशक्ती
अर्थ : जीवंत प्राणी.
उदाहरणे :
संकटसमयी तिने किती तरी प्राण वाचवले.
अर्थ : शरीरातील पंचवायूंपैकी एक ज्याचा संचार मुखात असतो.
उदाहरणे :
प्राणवायू सर्व प्राणिमात्रांचे जीवन श्वसनाद्वारा चैतन्यमय ठेवतो.
समानार्थी : प्राणवायू
प्राण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praan samanarthi shabd in Marathi.