बाटली (नाम)
काचेचे, लांबट व निमुळत्या मानेचे पात्र.
याग (नाम)
ज्यात हवन इत्यादी केले जाते तो धार्मिक कृत्याचा एक प्रकार.
यती (नाम)
मनोविकारास ताब्यात ठेवणारा.
स्तंभ (नाम)
एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख.
चुरस (नाम)
दुसर्याहून वरचढ होण्याचा प्रयत्न.
दांडगाई (नाम)
मस्ती, धिंगाणा घालण्याचे काम.
डिंक (नाम)
बाभळ, खैर, शेवगा इत्यादी झाडांपासून निघणारा चिकट पदार्थ.
अमर्याद (विशेषण)
सीमांनी बांधला न गेलेला.
अंतःपुर (नाम)
राणीची किंवा राजाच्या बायकोची राहण्याची जागा.
घुबड (नाम)
चेहर्यावर समोरच्या बाजूस डोळे असणारा, बाकदार पण आखूड चोच असलेला, कावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, एक निशाचर, शीकारी पक्षी.