अर्थ : रंग, रेषांच्या माध्यमातून कागद इत्यादींवर काढलेली वस्तू वा सजीवांची आकृती.
उदाहरणे :
तो चित्रकार कोणत्याही गोष्टीचे चित्र हुबेहूब काढतो
अर्थ : धातू, पाषाण इत्यादीवर कोरलेली आकृती.
उदाहरणे :
ह्या नाण्यावर घोड्याची प्रतिमा कोरलेली आहे.
समानार्थी : प्रतिमा
अर्थ : एखादे कथन,विवेचन,विवरण, इत्यादी स्पष्ट करण्यासाठी समोर दाखवण्यात येणारी वस्तूची प्रतिकृती.
उदाहरणे :
चित्राचा आधार घेऊन शिकविल्यावर मुलांना लवकर समजते.
चित्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chitr samanarthi shabd in Marathi.