अर्थ : शरीर कंपायमान होणे.
उदाहरणे :
अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
समानार्थी : कापरे भरणे, थरथरणे, थरारणे
अर्थ : एखाद्या धारधार वस्तूच्या दाबाने दुसर्या वस्तूचे तुकडे होणे.
उदाहरणे :
भाजी कापत आहे.
अर्थ : भीतीने शरीर कापणे.
उदाहरणे :
दहशतवाद्याल समोर पाहून सोहन थरथरू लागला.
समानार्थी : कंप सुटणे, थरथर कापणे, थरथरणे
अर्थ : एका विशिष्ट पद्धतीने गळा इत्यादी सावकाश कापणे.
उदाहरणे :
कसायाने बकरा कापला.
अर्थ : कात्रीने वा तशाच प्रकारच्या हत्याराने कापणे.
उदाहरणे :
झाडे कातरण्यासाठी माळी काकांनी नवीन कात्री आणली
समानार्थी : कातरणे
अर्थ : चालून अथवा वाहनाने रस्त्याचे अंतर पार पाडणे वा पूर्ण करणे.
उदाहरणे :
आम्ही दोघांनी १५ किलोमीटर अंतर कापले.
अर्थ : पगार, रोजमुरा इत्यादींचा काही भाग वगळणे.
उदाहरणे :
ह्या वर्षी माझ्या पगारातून २० टक्के आयकर कापला.
अर्थ : पत्त्याच्या खेलात पानांच्या गड्डीतून काही पाने वेगळी काढून ठेवणे.
उदाहरणे :
जादूगाराने सांगितल्याप्रमाणे मी पत्ते कापले.
समानार्थी : काटणे
अर्थ : पत्त्याच्या खेळत हुकुमाचे पान टाकून इतर पानांची कार्यक्षमता नाहीशी करणे.
उदाहरणे :
त्याने हुकुमचे पान टाकून माझा राजा कापला.
अर्थ : खूप पैसे खर्च करवणे.
उदाहरणे :
आज त्याला चांगला कापला.
अर्थ : एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे.
उदाहरणे :
पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते.
तो गर्दीला चिरत सर्वात पुढे गेला.
समानार्थी : चिरणे
कापणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaapne samanarthi shabd in Marathi.