अर्थ : अस्तित्वसूचक क्रियापद.
उदाहरणे :
राम त्या खोलीत आहे
अर्थ : (भूतकाळातील घटने संदर्भात) एखादी क्रिया करीत असणे.
उदाहरणे :
मी लहानपणी खूप मिठाया खात असे
अर्थ : एखाद्या बरोबर व्यक्तिगत किंवा व्यावसायिक संबंध ठेवणे.
उदाहरणे :
श्यामाचा एक प्रियकर आहे.
अर्थ : एखाद्या विशिष्ट किंवा निश्चित अवस्थेत असणे.
उदाहरणे :
मी बरोबर आहे.
अर्थ : एखाद्या ठिकाणी स्थित असणे किंवा निश्चित स्थितीत असणे.
उदाहरणे :
हिमालय भारताच्या उत्तरेला आहे.
समानार्थी : स्थित असणे
अर्थ : मन इत्यादीत एखादी गोष्ट धारण करणे.
उदाहरणे :
त्याच्याकडे विज्ञानाबाबत बरीच माहिती आहे
अर्थ : एखाद्या वस्तू, ठिकाणी इत्यादींमध्ये ठेवलेले असणे किंवा ठेवणे किंवा त्याच्या अंतर्गत असणे.
उदाहरणे :
टाकीत पाणी आहे.
ह्या बाटलीत दूध आहे.
अर्थ : लागलेला असणे.
उदाहरणे :
तो ज्या खोलीत बसून अभ्यास करत होता त्याला टाळा लागला होता.
समानार्थी : लागणे
असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asne samanarthi shabd in Marathi.