अर्थ : शौच, मूत्रविसर्जन इत्यादी क्रियेची इच्छा होणे.
उदाहरणे :
त्याला जोरात लागली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अंगवळणी पडणे.
उदाहरणे :
त्याला विड्या ओढायचे व्यसन लागले.
समानार्थी : जडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या ठिकाणी येऊन थांबणे.
उदाहरणे :
नाव किनार्याला लागली.
गाडी फलाटाला लागली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ढोल, वीणा इत्यादींची दोरी, तार, चामडे इत्यादी ताणले जाणे.
उदाहरणे :
शेकोटीची ऊब दिली की डफ चांगला चढतो.
तंबोरा चांगला लागला आहे.
समानार्थी : चढणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
उदाहरणे :
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
समानार्थी : श्रीगणेशा होणे, सुरवात होणे, सुरू होणे
अर्थ : एखाद्या वस्तूचा दुसर्या एखाद्या वस्तूला स्पर्श होणे.
उदाहरणे :
चालता चालता माझा हात विजेच्या खांब्याला लागला.
समानार्थी : स्पर्श होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तूची आवश्यकता असणे.
उदाहरणे :
आम्हाला काही नवीन वस्तूंची गरज आहे.
ह्या कामाला दोनशे कामगार लागतील.
समानार्थी : आवश्यकता असणे, गरज असणे, जरूरी असणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी की आवश्यकता या ज़रूरत होना।
हमें कुछ नई वस्तुओं की आवश्यकता है।अर्थ : भाग पडणे.
उदाहरणे :
पुस्तक हरवल्यास दंड भरावा लागतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पार पाडण्यासाठी सोपवणे.
उदाहरणे :
तुला त्यांना भेटवण्याचे काम माझ्याकडे लागले
अर्थ : शरीराचे अंग एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येणे.
उदाहरणे :
आंघोळ केल्याशिवाय मूर्तीला शिवू नकोस.
समानार्थी : तटणे, शिवणे, स्पर्श करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु से अपना कोई अंग सटाना या लगाना।
श्याम प्रतिदिन अपने माता-पिता के चरण छूता है।Make physical contact with, come in contact with.
Touch the stone for good luck.अर्थ : जाणीव होणे.
उदाहरणे :
मला कडाडून भूक लागली
अर्थ : प्रारंभ होऊन सुरू असणे.
उदाहरणे :
पाडव्याला नवे वर्ष लागते.
अर्थ : प्राप्त होणे, मिळणे.
उदाहरणे :
खणताना आठ फुटावर पाणी लागले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नाते वा संबंध असणे.
उदाहरणे :
ती तुझी कोण लागते?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीचा वाईट परिणाम होणे.
उदाहरणे :
भर दुपारी वणवण केल्याने त्याला ऊन लागले
समानार्थी : बाधणे
अर्थ : पूर्णपणे आणि योग्य रीतीने मिसळले जाणे.
उदाहरणे :
चिवड्यात मीठ व्यवस्थित लागले
अर्थ : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
उदाहरणे :
तंबोरा कसा छान लागला
समानार्थी : जुळणे
अर्थ : मुख्य विधी, संस्कार होणे.
उदाहरणे :
बारा वाजता लग्न लागले
अर्थ : मग्न, गुंतलेला असणे.
उदाहरणे :
वातावरण शांत असले की अभ्यासात मन लागते
अर्थ : एखादे वाहन किंवा व्यक्तीचे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचण्यासाठी वेळ खर्च होणे.
उदाहरणे :
मला घरी पोहचायला एक तास लागेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वाहन या व्यक्ति के एक स्थान से दूसरे तक पहुँचने के लिए समय का व्यतीत होना।
मुझे घर पहुँचने में एक घंटा लगेगा।लागणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laagne samanarthi shabd in Marathi.