पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टीका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टीका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विस्ताराने केलेले निरुपण.

उदाहरणे : शास्त्रीबुवांनी ईशोपनिषदावर छान टीका केली आहे

समानार्थी : विवरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय का कुछ विस्तार से किया हुआ वर्णन।

वह रामायण की टीका लिख रहा है।
आदर्श, टीका, तफ़सीर, व्याख्या
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीचे गुणदोष इत्यादींविषयी व्यक्त केले जाणारे विचार.

उदाहरणे : निष्पक्षपाती टीका नेहमीच उपकारक ठरते.

समानार्थी : आलोचना, टिप्पणी, शेरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात या कार्य के गुण दोष आदि के संबंध में प्रकट किया जाने वाला विचार।

वे आलोचना सुनकर भी अप्रभावित रहे।
आलोचन, आलोचना, खिंचाई, टीका-टिप्पणी

A serious examination and judgment of something.

Constructive criticism is always appreciated.
criticism, critique
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन.

उदाहरणे : त्याने आधुनिक कवितेवरची समीक्षा फारशी वाचलेली नाही.

समानार्थी : आलोचना, परीक्षण, समीक्षण, समीक्षा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छी तरह देख-भाल कर किसी साहित्यिक कृति के गुण और दोषों की विवेचना करने वाला लेख।

शिक्षिका ने नाटक की समालोचना लिखने के लिए कहा।
आलोचना, समालोचना

A written evaluation of a work of literature.

criticism, literary criticism

अर्थ : एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरण.

उदाहरणे : ज्ञानेश्वरी ही गीतेवरची मराठी टीका आहे

समानार्थी : भाष्य

अर्थ : एखाद्या गोष्टी संदर्भातले व्यक्त केलेले प्रतिकूल मत.

उदाहरणे : शासनाच्या धोरणावर विरोधकांनी कडाडून टीका केली

६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात एखाद्या गोष्टीवर टीका लिहिलेली असते ते.

उदाहरणे : आई रामायणाची टीका वाचत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पुस्तक जिसमें किसी विषय का कुछ विस्तार से वर्णन किया गया हो।

माँ रामायण की एक टीका पढ़ रही है।
टीका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टीका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teekaa samanarthi shabd in Marathi.