पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.

उदाहरणे : दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.

समानार्थी : खपणे, गमवणे, गमावणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे

२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : फिरण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणे.

उदाहरणे : तुम्ही कधी अमेरिकेला गेला आहात?

समानार्थी : फिरायला जाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* घूमने के लिए किसी स्थान पर जाना।

आप अमरीका कब गए थे?
जाना, यात्रा करना, सैर करना

Go to certain places as for sightseeing.

Did you ever visit Paris?.
travel to, visit
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी प्रणाली किंवा प्रक्रियेचे अनुसरण करणे किंवा एखाद्या मार्गाचा अवलंब करणे.

उदाहरणे : हा निरोप तुमच्याकडून पुढे गेला पाहिजे.
शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ती पुढे गेली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी प्रणाली या प्रक्रिया का अनुसरण करना या कोई मार्ग अपनाना।

यह जानकारी आप के जरिए जानी चाहिए।
वह बहुत सारी समस्याओं से गुजरी।
गुजरना, गुज़रना, जाना

Follow a procedure or take a course.

We should go farther in this matter.
She went through a lot of trouble.
Go about the world in a certain manner.
Messages must go through diplomatic channels.
go, move, proceed
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : निवास, संबंध किंवा कार्याचे ठिकाण इत्यादी बदलणे.

उदाहरणे : रमेश दुसर्‍या संघात गेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* निवास, संबंध या कार्य स्थान आदि बदलना।

रमेश दूसरी टीम में चला गया।
चला जाना

Change residence, affiliation, or place of employment.

We moved from Idaho to Nebraska.
The basketball player moved from one team to another.
move
५. क्रियापद / घडणे

अर्थ : पसरलेला असणे.

उदाहरणे : हा रस्ता कुठे जातो?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फैला होना या उपयोग के रूप में होना।

यह रास्ता कहाँ जाता है।
जाना

Lead, extend, or afford access.

This door goes to the basement.
The road runs South.
go, lead
६. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : नष्ट किंवा समाप्त होणे किंवा न राहणे.

उदाहरणे : त्यांच्या येण्याने माझी तहान-भूक जाते.
वीज गेली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नष्ट या समाप्त हो जाना।

उनके आने से मेरी भूख और प्यास चली जाती है।
चला जाना
७. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणाहून पुढे होणे किंवा चालणे.

उदाहरणे : नदी पार करून आम्ही पर्वताच्या दिशेने गेलो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी स्थान से आगे जाना अथवा चलना।

नदी पार करके हम लोग पर्वत की ओर बढ़े।
आगे बढ़ना, बढ़ना
८. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या ठिकाणापासून पुढे जाणे.

उदाहरणे : मी त्या गल्लीतून जात होतो तेव्हा त्याने मला पाहिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी स्थान, परिस्थिति आदि से होकर आना या जाना।

मैं उस गली से गुजर रहा था तब ही उसने मुझे देख लिया।
गुजरना, गुज़रना, निकलना
९. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : पाशी असलेली गोष्ट पाशी न राहणे.

उदाहरणे : वाईट सवयींमुळे त्याची नोकरी गेली.

समानार्थी : हातातून जाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पास से जाता रहना या हाथ में न रहना।

ग़लत आदतों के कारण उसकी नौकरी निकल गई।
चला जाना, निकलना, हाथों से निकल जाना, हाथों से निकलना
१०. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जाणे.

उदाहरणे : ते नाटक आता चालण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे.

समानार्थी : पोहचणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक अवस्था से दूसरी अवस्था को प्राप्त होना।

रहीम जी अब मरणासन्न अवस्था में पहुँच चुके हैं।
पहुँचना, पहुंचना

Reach a point in time, or a certain state or level.

The thermometer hit 100 degrees.
This car can reach a speed of 140 miles per hour.
attain, hit, reach
११. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे.

उदाहरणे : नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.

समानार्थी : पलायन करणे, पळणे

१२. क्रियापद / घडणे

अर्थ : प्रतिरूप असणे.

उदाहरणे : तो वडिलांवर गेला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रतिरूप होना।

मानस एकदम अपनी माँ पर पड़ा है।
पड़ना
१३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : नाहीसे होणे.

उदाहरणे : हा डाग धुतल्यावर जाईल.

समानार्थी : निघणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अंकित चिह्न आदि का न रहना।

सर्फ से कपड़े के दाग, धब्बे छूट जाते हैं।
उड़ना, छुटना, छूटना, निकलना, मिटना, हटना
१४. क्रियापद / घडणे

अर्थ : व्यतीत होणे.

उदाहरणे : आमची भेट होऊन आता बरीच वर्षे लोटली.

समानार्थी : लोटणे, होणे

१५. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : हलवलेले असणे.

उदाहरणे : ह्या कोनाड्यातील पुस्तक कुठे गेली.

१६. क्रियापद / घडणे

अर्थ : मोठी संख्या, परिमाण इत्यादीमधून छोटी संख्या, परिमाण इत्यादी कमी होणे.

उदाहरणे : दहामधून पाच वजा झाल्यास किती उरले?

समानार्थी : वजा होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिक मान, संख्या आदि में से छोटे मान, संख्या आदि का निकलकर अलग होना।

दस में से पाँच घटे कितने बचे?
कम होना, घटना, जाना
१७. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.

उदाहरणे : राम घरी गेला
आता मी येतो.

समानार्थी : निघणे, येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।

मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।
अभिसरना, अभिसारना, गमन करना, चलना, जाना, निकलना, प्रस्थान करना, रवाना होना, रुख करना

Move away from a place into another direction.

Go away before I start to cry.
The train departs at noon.
depart, go, go away
१८. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : प्राप्त न होणे.

उदाहरणे : एक फार मोठे काम माझ्या हातून गेले.

समानार्थी : निसटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राप्त न होना।

एक बहुत बड़ा काम मेरे हाथ में आते-आते फिसल गया।
न मिलना, प्राप्त न होना, फिसलना

Happen, occur, take place.

I lost my wallet; this was during the visit to my parents' house.
There were two hundred people at his funeral.
There was a lot of noise in the kitchen.
be

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaane samanarthi shabd in Marathi.