अर्थ : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.
उदाहरणे :
चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
समानार्थी : चिमणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : टिनाच्या पत्र्याचा धुराडदिवा.
उदाहरणे :
शेतकर्याच्या झोपडीत चिमणी जळत आहे.
अर्थ : एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण.
उदाहरणे :
चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.
समानार्थी : धुरांडे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A vertical flue that provides a path through which smoke from a fire is carried away through the wall or roof of a building.
chimneyअर्थ : दिव्यावर ठेवली जाणारी नळीच्या वा फुगीर आकाराची काच.
उदाहरणे :
ज्योत मोठी केल्याने चिमणी तडकली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
समानार्थी : गगनचिडी, जंगली चिडा, दहेंडी, रामगंगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चिमणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chimnee samanarthi shabd in Marathi.