पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चढवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चढवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : शरीरावर वस्त्र,आभूषण इत्यादी धारण करणे.

उदाहरणे : समारंभात जाण्यासाठी तिने चांगले कपडे घातले

समानार्थी : घालणे, धारण करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वस्त्र, आभूषण आदि शरीर पर धारण करना।

उसने नहा-धोकर अच्छे कपड़े पहने।
अवधारना, डालना, धारण करना, पहनना

Be dressed in.

She was wearing yellow that day.
have on, wear
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी ओझे किंवा सामान चढविणे.

उदाहरणे : त्याने ट्रकात सामान लादले.

समानार्थी : चढविणे, लादणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बोझ या भार ऊपर लेना।

ट्रक पर चढ़ाने के लिए मजदूर ने पीठ पर बोरी लादी।
लादना
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : चढवण्याचे काम इतरांकडून करवून घेणे.

उदाहरणे : बाबांनी मुलाला माळ्यावर चढवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चढ़ने अथवा चढ़ाने का कार्य अन्य से कराना।

पिताजी ने मुझे झूले पर चढ़वाया।
चढ़वाना
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे.

उदाहरणे : रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.

समानार्थी : चढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पद, मर्यादा, वर्ग आदि में बढ़ाना।

उसे एकदम से छठी कक्षा में चढ़ा दिया।
चढ़ाना

Give a promotion to or assign to a higher position.

John was kicked upstairs when a replacement was hired.
Women tend not to advance in the major law firms.
I got promoted after many years of hard work.
advance, elevate, kick upstairs, promote, raise, upgrade
५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे.

उदाहरणे : मी माझे सामान घोड्यावर लादले.

समानार्थी : ठेवणे, लादणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के ऊपर चीज़ रखाना या भराना।

मेरा सामान अभी नहीं चढ़ा है।
ट्रक में सामान लद गया।
चढ़ना, लदना

Fill or place a load on.

Load a car.
Load the truck with hay.
lade, laden, load, load up
६. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखादा पातळ पदार्थ दुसर्‍या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे.

उदाहरणे : सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.

समानार्थी : चढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक चीज़ पर दूसरी चीज़ को लगाना, चिपकाना, सटाना या आवरण के रूप में लगाना।

राजगीर दीवार पर पलस्तर चढ़ा रहा है।
सुनार ने चाँदी की पायल पर सोने का पानी चढ़ाया।
दीदी तकिए पर खोल लगा रही है।
चढ़ाना, लगाना

Apply to a surface.

She applied paint to the back of the house.
Put on make-up!.
apply, put on
७. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याला अधिक जास्त महत्त्व देणे.

उदाहरणे : आईने लहान भावाला खूपच चढवले आहे.

समानार्थी : चढविणे

८. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : (संगीतात) स्वर तीव्र करणे.

उदाहरणे : भीमसेन ह्यांनी शेवटच्या अभंगात स्वर चढवला.

समानार्थी : चढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(संगीत) तीव्र करना।

गुरु माँ भजन गाते समय अपने स्वर को बहुत चढ़ाती हैं।
चढ़ाना
९. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट खालून वर नेणे.

उदाहरणे : टाकीमध्ये पाणी चढवले.

समानार्थी : चढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीचे से ऊपर की ओर ले जाना।

वह रोज सुबह मोटर से टंकी में पानी चढ़ाता है।
चढ़ाना
१०. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मादक पदर्थांचे सेवन करणे.

उदाहरणे : आज त्याने जरा जास्तच घेतली.
त्याने मनसोक्त भांग चढवली.

समानार्थी : घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नशीली वस्तुओं का सेवन करना।

त्योहार के दिन भी वह पीता है।
चढ़ाना, पीना
११. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्याच्या ठिकाणी अहंकार वाढेल असे करणे.

उदाहरणे : त्याचे मित्र त्याला चढवतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी में कुछ अभिमान उत्पन्न करना या किसी को अधिक महत्व देना।

उसको ज्यादा मत चढ़ाओ।
रमेश ने चाटुकारिता करके महेश को चढ़ा दिया।
अभिमानित करना, चढ़ाना, फुलाना, बढ़ाना
१२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वाद्याची तार वा चामडे ताणणे.

उदाहरणे : गणूने ढोलकी चढवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सितार, ढोल आदि की डोरी या तार कसना या तानना।

ढोलकिया ढोलक चढ़ा रहा है।
चढ़ाना

Alter or regulate so as to achieve accuracy or conform to a standard.

Adjust the clock, please.
Correct the alignment of the front wheels.
adjust, correct, set
१३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : चढायला लावणे.

उदाहरणे : आंबे काढण्यासाठी त्यांनी दिनूला झाडावर चढवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चढ़ने में प्रवृत्त करना।

नौकर ने अपंग दादाजी को उठाकर खाट पर चढ़ाया।
चढ़ाना
१४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे.

उदाहरणे : नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.

समानार्थी : लादणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के ऊपर कोई वस्तु रखना या भरना।

नौकर ने ट्रैक्टर पर अनाज की बोरियाँ लादी।
चढ़ाना, भरना, लादना

Put (something) on a structure or conveyance.

Load the bags onto the trucks.
load
१५. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे.

उदाहरणे : त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.

समानार्थी : चढविणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चढवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadhvane samanarthi shabd in Marathi.