पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खरकटे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खरकटे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : खरकट्या अन्नाचा कण, चुरा इत्यादी.

उदाहरणे : जेवण झाल्यावर तिने सर्व खरकटे उचलून ओल्या फडक्याने लादी पुसली.

अर्थ : राहिलेला अपुरा व्यवहार.

उदाहरणे : त्याचे खरकटे आवरता आवरता फार त्रास झाला.

अर्थ : न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक.

उदाहरणे : भाजलेली मुगाची डाळ खरकटी नसल्याने धान्यफराळाला चालते.

खरकटे   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पाण्यात शिजवलेले किंवा मिसळलेले.

उदाहरणे : पीठ दुधात किंवा फळाच्या रसात मिसळलेले असतील तर ते खरकटे होत नाही.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला पाण्यात शिजवलेले अन्न लागले आहे वा त्या अन्नाचा स्पर्श झाला आहे असा.

उदाहरणे : तुझे खरकटे ताट मोरीत घासायला ठेव.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खरकटे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kharkate samanarthi shabd in Marathi.