म्हण म्हणजे असा वाक्यांश ज्याचा उद्देशीत अर्थ शब्दशः अर्थाहून भिन्न असतो. म्हण पूर्ण वाक्यात नसल्यामुळे बहुतेक वेळा तिचा स्वतंत्रपणे प्रयोग करता येत नाही. म्हणींचा वापर केल्यामुळे भाषा अधिक सजीव आणि आकर्षक बनते, मात्र म्हणीचा अयोग्य संदर्भाने उपयोग केल्यास अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इथे मराठी भाषेतील म्हणी त्यांचा अर्थ आणि वाक्य प्रयोगासह देण्यात आला आहे. तुमचे मराठी भाषाविषयक ज्ञान समृद्ध बनविण्यासाठी त्या निश्चितपणे उपयुक्त ठरतील.