कांदा (नाम)
एक प्रसिद्ध कंद जो खाण्याच्या कामी येतो.
पुढारी (विशेषण)
एखाद्या क्षेत्रात वा विषयात लोकांचे नेतृत्व करणारा.
अंदाज (नाम)
एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान.
अंकुर (नाम)
पेरलेल्या बीमधून निघणारा कोवळा देठ.
भगिनी (नाम)
एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आईवडिलांची किंवा काका, मामा आत्या, मावशी यांची मुलगी.
मृगाजिन (नाम)
हरणाचे कातडे जे पवित्र मानले जाते.
कवड्या तितर (नाम)
आकाराने गाव तित्तिराएवढा एक पक्षी.
प्रवास (नाम)
एका ठिकाणाहून दुसर्या दूरवरच्या ठिकाणी जाण्याची क्रिया.
फिरणे (क्रियापद)
एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
तितर (नाम)
कावळ्यापेक्षा मोठा, गुबगुबीत, कासर तांबूस रंगाची, लांडी शेपटी असलेला, एक पक्षी."तित्तिर भांडखोर असल्याने ह्या पक्ष्यांच्या झुंजी लावतात".