अर्थ : खरकट्या अन्नाचा कण, चुरा इत्यादी.
उदाहरणे :
जेवण झाल्यावर तिने सर्व खरकटे उचलून ओल्या फडक्याने लादी पुसली.
अर्थ : राहिलेला अपुरा व्यवहार.
उदाहरणे :
त्याचे खरकटे आवरता आवरता फार त्रास झाला.
अर्थ : न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक.
उदाहरणे :
भाजलेली मुगाची डाळ खरकटी नसल्याने धान्यफराळाला चालते.
अर्थ : पाण्यात शिजवलेले किंवा मिसळलेले.
उदाहरणे :
पीठ दुधात किंवा फळाच्या रसात मिसळलेले असतील तर ते खरकटे होत नाही.
अर्थ : ज्याला पाण्यात शिजवलेले अन्न लागले आहे वा त्या अन्नाचा स्पर्श झाला आहे असा.
उदाहरणे :
तुझे खरकटे ताट मोरीत घासायला ठेव.
खरकटे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kharkate samanarthi shabd in Marathi.