तुळई (नाम)
गृहदिकांचे खण वेगळे करण्यासाठी दोन खांबांवर आडवे बसवलेले लाकूड.
बिछाना (नाम)
निजण्यासाठी अंथरण्याच्या उपयोगी येणारी वस्त्रे इत्यादी.
हौतात्म्य (नाम)
चांगल्या गोष्टीसाठी मृत्यू स्वीकारणे.
कमळ (नाम)
तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
नीलकमळ (नाम)
निळ्या रंगाचे कमळ.
दालन (नाम)
घर, वाडा इत्यादिकांतील एकसारखी, लांब अशी मोठी खोली.
अंगीकार (नाम)
एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करणे.
स्वार्थी (नाम)
ज्याचा मनात स्वार्थ भरला आहे किंवा स्वतःचा फायदा पाहणारी व्यक्ती.
शेकोटी (नाम)
थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून केलेला गवत,वाळक्या काटक्या,पाने इत्यादींचा विस्तव.
युद्धनौका (नाम)
ज्यावर अनेक तोफा बसवलेल्या असतात ती युद्धात वापरायची नौका.