अर्थ : मडके इत्यादिकास आकार देण्याचे कुंभाराचे साधन.
उदाहरणे :
कुंभार चाकावर पणत्या बनवत आहे
समानार्थी : चाक
अर्थ : चाकासारखी गोल वस्तू.
उदाहरणे :
ह्या यंत्रात कित्येक चक्रे आहेत.
अर्थ : बसण्यासाठी जागा असलेले, गोल-गोल फिरणारे, गोलाकार मनोरंजनाचे खेळणे.
उदाहरणे :
जत्रेत आम्ही चक्रात बसलो होतो.
अर्थ : नेहमी गोल फिरणारी वा तशी फिरावी म्हणून बनविलेली गोल वस्तू.
उदाहरणे :
कुंभाराचे चाक हे एक प्रकारचे चक्र आहे.
अर्थ : शांतपणे एका ठिकाणी बसून गुप्त किंवा अदृश्य रुपाने केली जाणारी कारवाई.
उदाहरणे :
हे सगळे चक्र तुम्हीच चालवलेले आहे.
अर्थ : धातुपासून बनवलेले एक प्रकारचे पदक जे सैनिकांची बहादुरी व धडाडी बघून त्यांना दिले जाते.
उदाहरणे :
त्याला राष्ट्रपतीकडून परमवीर चक्र मिळाले आहे.
अर्थ : असा कालावधी ज्यावेळेत काही विशिष्ट घटना क्रमाने होतात व पुनः तेवढ्याच कालावधीत त्याची पुनरावृत्ती होते.
उदाहरणे :
हे चित्र फुलपाखरूच्या जीवनाचे चक्र दर्शवते.
अर्थ : योगमार्गात कल्पिलेले चक्र.
उदाहरणे :
मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्ध, सहस्रार ही सहा चक्रे आहेत.
अर्थ : चाकासारखे एक आयुध.
उदाहरणे :
विष्णूच्या चक्राचे नाव सुदर्शन असे आहे
अर्थ : लाकूड, लोखंड इत्यादीचा गोलाकार साचा जो सळ्या इत्यादींनी चक्राच्या केंद्राला जोडलेला असतो आणि एखाद्या अक्षास केंद्र मानून त्याच्या चारी बाजूंनी फिरतो तसेच वाहन, रथ इत्यादीं पुढे ओढत जातो.
उदाहरणे :
मुले चक्रात बसली आहेत..
चक्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakr samanarthi shabd in Marathi.