अर्थ : करणे किंवा एखादी अवस्था इत्यादी निर्माण होईल किंवा एखादा भाव इत्यादी उत्पन्न होईल असे काही करणे.
उदाहरणे :
तुम्ही फार मोठी चूक करत आहात.
अर्थ : एखाद्या कामास शेवटपर्यंत नेणे.
उदाहरणे :
मूर्तिकाराने हाती घेतलेले काम पूर्ण केले.
समानार्थी : तडीस नेणे
अर्थ : वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे.
उदाहरणे :
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात नक्कीच सुधार आणेल.
समानार्थी : आणणे
अर्थ : एका निश्चित किंवा विशिष्ट पद्धतीने व्यवहार करणे.
उदाहरणे :
तुम्ही मला खूश केले.
हे काम काळजीपूर्वक कर.
अर्थ : एखादी घटना इत्यादी घडण्याचे कारण असणे.
उदाहरणे :
मी कोणताही चमत्कार नाही केला.
अर्थ : करणे किंवा होण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरणे :
त्याने आपल्या कार्यालयात घोटाळा केला.
अर्थ : एखादे काम करणे.
उदाहरणे :
प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल.
अर्थ : एखाद्या रूपात स्वीकारणे किंवा अंगिकारणे.
उदाहरणे :
विश्वासने ह्या महालाला त्याचे घर केले.
अर्थ : एखाद्या आकाराचे दुसर्या आकारात रूपांतर करणे.
उदाहरणे :
जादूगारानी रुमालाला फूल बनवले.
समानार्थी : बनवणे
अर्थ : प्रवासासाठी भाड्याने गाडी घेणे वा ठरविणे.
उदाहरणे :
त्यांनी माहिमहून दादरला जाण्यासाठी टॅक्सी केली.
अर्थ : आनंददायी वस्तू उपभोगणे किंवा त्यांचा अनुभव घेणे.
उदाहरणे :
आम्ही सहलीला खूप मजा केली
समानार्थी : लुटणे
अर्थ : एखादे काम इत्यादीत मग्न राहणे.
उदाहरणे :
तुम्ही तुमचे काम करा, यश नक्की मिळेल.
समानार्थी : करत राहणे
अर्थ : लग्न वा विवाह करणे.
उदाहरणे :
त्याने दुसरी बायको केली.
अर्थ : खेळ इत्यादीत गुण किंवा एखादे लक्ष्य प्राप्त करणे.
उदाहरणे :
आम्ही दोन गोल केले.
अर्थ : एखादे काम करण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
इंग्रज इथे व्यापार करण्यात सफल झाले.
समानार्थी : काम करणे
करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karne samanarthi shabd in Marathi.